Monday, February 13, 2012

शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण कसे मिळणार?

वेळ नाही आई वडिलांना
त्यांना शाळेत कोण नेणार...?
हे सतत स्थलांतरीत असतात
यांना शाळेत कोण घेणार...?
यांना मराठी येत नाही
मग यांना कोण शिकविणार...?
त्यांना वाटते आमच्या भाषेत शिकवावे
त्यांच्या भाषेचे शिक्षक कोठे मिळणार...?
हे रोज शाळेला येत नाहीत
यांची जबाबदारी कोण घेणार...?
जरी शाळेत आले तरी
त्यांच्याशी कोण बोलणार...?
यांना वयाप्रमाणे दाखल करायचे आहे
तर यांना पहिल्यापासून कोण शिकविणार...?
किंवा त्यांच्यासाठी कोण वेळ काढणार...?
शासन म्हणते सर्व मुले शाळेत आली पाहिजेत
तर मुलांपर्यंत कोण पोहचणार...?
जरी कोणी पोहचले तरी
ही मुले दूरवरून, मोठे रस्ते क्रॉस करून
शाळेत कशी येणार...?
जर त्यांचे बरोबर कोणी नसेल
तर गरीबांची मुले घरापर्यंत
सुरक्षित कशी परतणार...?
एवढ्या सगळ्या अडचणी आहेत
तर वंचितापर्यंत शिक्षण कसे पोहचणार...?
यासाठी काही मंडळी प्रयत्‍न करीत आहेत
त्यांना आर्थिक आधार कोण देणार...?
शासन अनेक गोष्टींवर अर्थ काढते
मग समाज सेवकांच्या अर्थाचा अर्थ कोण काढणार...?
तर वंचितापर्यंत शिक्षण कसे पोहचणार...?
मग सांगा साहेब, सर, मास्तर,
आपला भारत महासत्ता कसा होणार...?

- हरिश्चंद्र फडके

No comments:

Post a Comment