जून २०१४ मधे 'डोअर स्टेप स्कूल'तर्फे 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अभियानासाठी पुण्यातल्या कन्स्ट्रक्शन साईट्सवरील कामगार वस्त्यांचा सर्व्हे सुरु होता. धानोरीतल्या एका साईटवर, ११ वर्षांची आरती, ८ वर्षांची भारती, आणि ६ वर्षांची प्रीती, या तीन मुली आपल्या आई-वडील आणि अजून एका लहान बहिणीसोबत राहत होत्या. या चौथ्या मुलीचं नाव जरा विचित्रच होतं - नाखुषी! त्यांची आई नंदाबाई सुरेश हिरवळे, या साईटवर मजुरी करुन आपला आजारी नवरा आणि चार लहान मुलींचा संसार चालवत होत्या. त्या चौथ्या मुलीच्या, नाखुषीच्या विचित्र नावाबद्दल विचारलं तर त्या म्हणाल्या की, तीन मुलींनंतर आम्हाला मुलगाच हवा होता, पण ही झाली... म्हणून आम्ही नाखूष होतो, तसंच नाव ठेवलं!
चौघींतली सर्वात मोठी आरती, यवतमाळच्या आपल्या मूळ गावी असताना पाचवीपर्यंत शाळेत जात होती. आई-वडील रोजगाराच्या शोधात पुण्याला स्थलांतरित झाल्यावर, धाकट्या बहिणींकडं लक्ष देण्याची जबाबदारी आरतीवर येऊन पडली. भारती आणि प्रीतीनं शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. आधी नंदाबाई आपल्या मुलींना शाळेत पाठवायच्या विरोधात होत्या. पण एडमिशनच्या दिवशी त्या स्वतः आपल्या दोन मुलींना घेऊन शाळेत उगवल्या. खरं तर त्यांना त्याच दिवशी नवर्याला उपचारांसाठी दवाखान्यात घेऊन जायचं होतं, पण मुलींच्या शाळा-प्रवेशासाठी त्यांनी दवाखान्याचा बेत पुढं ढकलला. आपल्या मुलींचं आयुष्य आपल्यासारखं खडतर नसावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, असं त्यांना मनापासून वाटत होतं, आणि हे सगळं शिक्षणातूनच साध्य करता येईल, हे त्यांना पटलं होतं.
भारती आणि प्रीती शाळेत पोचल्या असल्या तरी आरतीला मात्र छोट्या 'नाखुषी'ला सांभाळण्यासाठी घरीच थांबावं लागलं. ती अर्थातच याबद्दल नाखूष होती. तिलाही आपल्या इतर बहिणींसोबत यायचं होतं. नंदाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घरी एकटं ठेवायला तयार नव्हत्या. त्यांचा नवरा दिवसभर घरीच असायचा, पण तो स्वतः आजारी!
भारती आणि प्रीती आता नियमितपणे धानोरीच्या मनपा शाळेत जातात, 'डोअर स्टेप स्कूल'नं अरेंज केलेल्या व्हॅनमधून. आपल्याला दिलेल्या नावाचं ओझं 'नाखुषी'ला आयुष्यभर वागवावं लागेल याची जाणीव होऊन, तिच्या आई-वडीलांनी तिला नविन नाव दिलं - पल्लवी! हा फक्त नावातला बदल नाही, मानसिकतेतला बदल आहे, मुलींबद्दलच्या दृष्टीकोनातला बदल आहे!
आरतीलासुद्धा आपल्या बहिणींसोबत शाळेत जायचं आहे. तिला कशी मदत करता येईल? कन्स्ट्रक्शन साईट्सवर काही पाळणाघरांची, डे-केअर्सची सुविधा उपलब्ध नसते. अशा मुलांच्या समस्या अजून वेगळ्याच... पण, त्या चारपैकी दोन मुली आता शाळेत जातायत आणि तिसरी छोटीदेखील जाईल योग्य वयात! सर्वसमावेशक मूलभूत शिक्षणाच्या प्रसारासाठी या 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अभियानात काम करताना भारती, प्रीती, आणि नाखुषी (आता पल्लवी) यांची उदाहरणंच तर आमची आशा आणि उत्साह वाढवत राहतात.
- डी.एस.एस. इसीसी टीम

Like every child counts, Aarti too should be able to go to school some how when, pallavi gets older and starts school, she can join too :)
ReplyDelete